राजधानी दिल्ली येथे कडाक्याची थंडी पडली आहे. गेल्या 22 वर्षातील आजवर तापनाचा पार 12 अंशावर कधीन न आल्याने यंदा रेकॉर्डब्रेक थंडीचे वातावरण दिल्लीकरांना अनुभवायला मिळत आहे. गेल्या 24 तासात हलकी सुर्याची किरणे सुद्धा दिल्लीत पोहचलेली नाहीत. तर आज ही तापमानात बदल होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात मंगळवारी तापमानाचा पारा 12.2 अंश डिग्रीवर पोहचल्याने दिल्लीकर कुडकुडले आहेत. किमान तापमान 10.4 डिग्री असून त्यात 2 डिग्रीने वाढ झाली आहे. जास्तीत जास्त आणि किमान तापमान यांच्यामध्ये 2.2 डिग्रीचा फरक आहे. येथील स्थानिकांना कडाक्याच्या थंडीचा त्रास होत असून गरम कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. त्याचसोबत दिल्लीतील नजफगढ येथे सकाळच्या वेळेस सर्वाधिक थंडी दिसून आली. या ठिकाणी तापमान 11.1 डिग्री होते. हवामान खात्याने असे सांगितले आहे की, यापूर्वी 28 डिसेंबर 1997 मध्ये दिल्लीतील तापमान 11.3 डिग्री झाले होते.
हवामान खात्याचे डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या मते, सध्या पश्चिम हिमालय क्षेत्रामधून बर्फाळ हवा दिल्लीच्या दिशेने वाहत आहे. त्याचसोबत आकाश हे काळ्या रंगाचे झाले असून सूर्याची किरणे जमिनीवर पोहत नाही आहेत. याच कारणामुळे दिल्लीतील पारा 12 अंशावर गेला आहे. तर शुक्रवारी दिल्लीलत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (सिमल्यातील बर्फवृष्टीतून महाराष्ट्रातील 90 तर राजस्थानातील 80 विद्यार्थ्यांची सुटका)
तसेच आजसुद्धा दिल्लीतील तापमानात काहीच बदल होणार नाही आहे. अधिकतम तापमान 14 डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरणात सुधारणा होऊ शकते. गुरुवारी तापमान 15 डिग्रीवर पोहचू शकते तर 20 आणि 21 डिसेंबरला हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिवशी अधिकतम तापमान 18 डिग्री राहण्याची शक्यता आहे.