उत्तर-पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र आता दिल्लीतील परिस्थिती पूर्ववत होत असून सामान्य होत आहे. पोलिसांनी अपील केल्यानंतर उत्तर पूर्व दिल्लीतील परिस्थितीत सुधारणा होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून कामावर जावे आणि दुकाने सुद्धा सुरु करावीत असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडून कामावर जाण्यास आणि दुकाने सुरु केली आहेत. मात्र उत्तर-पूर्व दिल्लीतील शाळा अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच येत्या 7 मार्च पर्यंत शाळा बंद राहणार असून परिक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसर, उत्तर-पूर्व जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यातील शाळांमधील सर्व वार्षिक परिक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची परिक्षा मार्च 2 रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परिक्षा 29 फेब्रुवारीला पार पडणार होती.(Delhi Violence: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, हिंसाचारादरम्यान घरे खाक झालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत)
शिक्षा निदेशालय, दिल्ली सरकार: उत्तर-पूर्वी जिले के सभी सरकारी, सरकारी सहायता प्राप्त और निजी मान्यता प्राप्त स्कूल 7 मार्च 2020 तक छात्रों के लिए बंद रहेंगे। जिले के स्कूलों के लिए वार्षिक परीक्षा की नई तारीखों की घोषणा जल्द की जाएगी।
— ANI_HindiNews (@AHindinews) February 29, 2020
दरम्यान, उत्तर पूर्व दिल्लीत 23 फेब्रुवारी पासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच आंदोलकांनी दुकाने पेटवण्यासोबत तोडफोड केली. या घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयात जवळजवळ 150 नागरिकांवर उपचार सुरु आहे. दिल्ली हिंसाचारात जखमी किंवा मृतांच्या परिवाराल दिलासा देण्यासाठी काही पावले उचलली आहेत. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मात्र जे खासगी रुग्णालयात उपचार करणार असल्यास त्यांनी फरिश्ते स्कीम अंतर्गत योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे.तसेच केजरीवाल यांनी असे ही म्हटले आहे की, ज्या व्यक्ती यामध्ये आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जर आम आदमी पार्टीचा कोणताही व्यक्ती दोषी असेल तर त्याला दुप्पट शिक्षा दिली जाणार आहे.