Delhi Shocker: लोकप्रिय यूट्यूबर Swati Godara ने पीजीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या; UPSC च्या तयारीसाठी आली होती दिल्लीला
Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

YouTuber Swati Godara Jumps To Death: दिल्लीच्या (Delhi) मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) एका युट्यूबर महिलेने (Woman YouTuber) पीजीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वाती गोदारा (29) असे या महिलेचे नाव असून, ती यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला आली होती. ती गेल्या 10 वर्षांपासून मुखर्जी नगर परिसरात राहात होती. आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ते प्रत्यक्षदर्शी आणि तिच्या मित्रांची चौकशी करत आहेत.

स्वाती ही तिच्या प्रियम नावाच्या मित्रासोबत पीजी रूममध्ये असताना बुधवारी (17 एप्रिल) ही घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी प्रियमला ​​ताब्यात घेतले असून त्याची तसेच मृताच्या इतर मित्रांची चौकशी सुरू आहे.

स्वातीने मुखर्जी नगर भागात सुमारे चार महिन्यांपूर्वी खोली भाड्याने घेतली होती. तिने घर मालकाला सांगितले होते की तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता ती पूर्णवेळ युट्यूबर आहे. स्वाती सुमारे दहा वर्षांपूर्वी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत आली होती. ती उत्तर प्रदेशातील मेरठमधील बधला गावची रहिवासी होती. स्वातीने याआधी एसएससीची परीक्षा दिली होती पण तिला यश आले नाही. यूपीएससी आणि एसएससी परीक्षेतील सर्व आशा गमावल्यानंतर स्वातीने यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Woman Enters Delhi Bus Wearing A Bikini: काय सांगता? फक्त बिकिनी घालून महिलेने केला दिल्लीच्या बसमधून प्रवास; व्हिडिओ व्हायरल)

स्वातीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुमारे 28.6 हजार फॉलोअर्स असून, तिने 205 पोस्ट केल्या आहेत. तिचे यूट्यूबवर 67 फॉलोअर्स होते आणि तिने तिच्या यूट्यूब अकाउंटवर 33 व्हिडिओ अपलोड केले होते. स्वातीच्या नातेवाईकांनी तिच्या आत्महत्येमागे कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. दरम्यान, याआधी, हरियाणामध्ये एका युट्युबर जोडप्याने एका उच्चभ्रू इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेले हे जोडपे हरियाणातील बहादूरगडमध्ये राहत होते. गरवित (25) आणि नंदिनी (22) अशी त्यांची नावे असून, ते उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी आहेत. ही घटना शनिवारी (13 एप्रिल) घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.