प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit - Pixabay)

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) कुत्र्यावर बलात्काराचे (Rape on Dog) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे., दिल्लीत एका मध्यमवयीन व्यक्तीला एका कुत्र्यावर बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीचे हे कृत्य कॅमेरात कैद झाले असून, त्यानंतर त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पवन मल्होत्रा असे आरोपीचे नाव असून तो, एका खाजगी कल्याणकारी संस्थेत सन्माननीय पदावर काम करत होता.

कथितरित्या पवन मल्होत्रा याचा कुत्र्यासोबत आक्षेपार्ह स्थितीमधील व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. यामध्ये एक अर्धनग्न व्यक्ती कुत्र्यावर जबरदस्ती करताना दिसत आहे. यामुळे आता समाजात प्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अनैसर्गिक गुन्ह्याचा गुन्हा (कलम 377) दाखल करण्यात आला आहे.

(व्हिडिओमधील दृश्य विचलित करू शकते)

पवन मल्होत्रा ​​वारंवार भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करत असल्याची माहिती देण्यासाठी पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) च्या सदस्याने पोलिसांशी संपर्क साधला होता. या प्रकरणी 14 सप्टेंबर रोजी राजौरी गार्डन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला गेला. तपासात 2019 पासून पवन अशा कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळले. याबाबत गरिमा बजाज नावाच्या प्राणीप्रेमीने ट्विट करत सांगितले की, ‘हा माणूस 2019 पासून अशा गोष्टी करत आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आणि त्याच्या कुटुंबाला याची जाणीव असूनही, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.’ (हेही वाचा: Court On Husband-Wife and Other Woman: पत्नी दीर्घकाळ दूर असल्यास पतीने दुसऱ्या महिलेसोबत सहवास करणे क्रूरता नव्हे- हायकोर्ट)

सुप्रसिद्ध प्राणी कार्यकर्ती तरणा सिंग यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, पवन मल्होत्रा ​​याने केलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर गुन्हेगाराचे कुटुंब हिंसक झाले आहे. ज्याने या बलात्काराची तक्रार केली त्याला पवनच्या मुलाने आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केली. ज्या स्थानिकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि पीएफए ​​सदस्यांना सांगितली त्यांच्यावरही हल्ला झाला.