दिल्ली (Delhi) मधील जामिया (Jamia) येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शाहीनबाग (Shahihbaug) मध्ये गोळीबार झाल्याने राजधानी दिल्लीचे वातावरण चांगलेच पेटले आहे. शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, हा तरुण पूर्व दिल्लीचा त्याचे नाव कपिल गुज्जर (Kapil Gujjar) असे असल्याचे समोर आले आहे. या तरुणाला पोलीस अटक करून घेऊन जात असताना, त्याने “या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाची नाही” असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. तरुणाने आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरिकेट्सजवळ हवेत गोळीबार केला आणि ही जागा तात्काळ खाली करा अशी धमकी दिली. गोळीबार होताच पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. जामिया विद्यापीठामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार
दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, कपिल याने शाहीनबाग हवेत गोळीबार केला होता. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र यानंतर पोलिसांनी तात्काळ कपिल याला अटक करून सरिता विहार पोलीस ठाण्यात नेले आहे.
ANI ट्वीट
#WATCH Delhi: Man who had fired bullets in Shaheen Bagh area being taken away from the spot by police. pic.twitter.com/lenDhRcWGD
— ANI (@ANI) February 1, 2020
दिल्लीत नागरिकत्व कायदा विरोधी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान झालेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी गुरुवारी 'जामिया मिलिया इस्लामिया'च्या परिसरातही गोळीबार झाला होता. रामभक्त गोपाल असे नाव सांगणाऱ्या इसमाने निदर्शकांवर गोळी चालवली होती. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. पोलिसांच्या डोळ्यांदेखत ही घटना घडत असतानाही अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याने यावर देशवासीयांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिल्या होत्या.