आज सकाळी दिल्लीत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट. (Photo/ANI)

Delhi Weather Update: राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी (2 मे) पहाटे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Delhi Rains) झाला. या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले (Waterlogging in Delhi), रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली आणि दिल्ली विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम (Delhi Airport Flight Delays) झाला. खास करुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली (Traffic Jam Delhi) आणि प्रवासी-नागरिकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. मुसळधार पावसामुळे वाढत्या तापमानापासून-उष्म्यापासून आवश्यक असलेली सुटका मिळाली परंतु संपूर्ण शहरात गोंधळ निर्माण झाला. दिल्ली NCR साठी हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा (Delhi Weather Forecast देण्यात आला आहे.

विमान उड्डाणांवर परिणाम

दिल्लील हवामान अंदाज आणि विमानोड्डाण स्थितीबाबत सांगायचे तर,  दिल्ली विमानतळ प्रशासनाने X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या सल्ल्यात म्हटले आहे की, खराब हवामान आणि वादळी वाऱ्यांमुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे. 'दिल्लीमध्ये खराब हवामान आणि मेघगर्जनेसह वादळामुळे काही उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. आमच्या ग्राउंड टीम्स प्रवाशांना सुरळीत आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांसोबत काम करत आहेत. प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपन्यांशी संपर्क साधून अधिकृत माहिती घ्यावी,' असे दिल्ली विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. (हेही वाचा, IMD May Forecast: मे महिन्यात उष्णतेची लाट वाढणार! भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान, वादळांचीही शक्यता; जाणून घ्या हवामान अंदाज)

शहरभर पाणी साचले, वाहतूक ठप्प

  • खानपूरहून आलेल्या फुटेजमध्ये गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाहने जात असल्याचे दिसून आले. आरके पुरममध्ये, मेजर सोमनाथ मार्गावरील दृश्यांमध्ये रस्त्यांवर पडलेली झाडे उखडलेली दिसत होती, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली होती.
  • पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना आणि वाहतूक शोधताना ऑफिसला जाणारे आणि विद्यार्थ्यांना त्रास होत होता.
  • डीडीयू मार्गावर, मुकेश नावाच्या व्यक्तीने ANI ला सांगितले, 'मी लक्ष्मी नगरला कामावर जात आहे. या पावसामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला. पण आता मी ऑफिसला उशीर झालाय. मी पहाटे 5 वाजलेपासून पासून इथे अडकलो आहे. इथे ट्राफिक जाम आणि नुकताच अपघातही झाला. इथे पाणी साचलेलं नाही, पण कनॉट प्लेस फ्लायओव्हरवर खूप कोंडी आहे.” (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी वारे, उकाडा आणि पावसाची शक्यता – IMD चा इशारा)

आयएमडीने वर्तवलेला दिल्ली NCR साठी हवमान अंदाज

मिंटो ब्रिज दिशेने येणाऱ्या सोमवीर नावाच्या व्यक्तीने सांगितले, 'हा पाऊस उष्म्यापासून दिलासा देणारा आहे. थोडं गारठल्यासारखं वाटतंय... पण अंडरपासमध्ये पाणी साचलं आहे. बाईक आणि रिक्षा बंद पडत आहेत. आम्ही तिथून परत आलो.'

दिल्लीतील एकूण परिस्थिती थोडक्यात

भाग परिणाम
दिल्ली विमानतळ हवामानामुळे काही उड्डाणे रद्द/उशीर
खानपूर गुडघ्याएवढं पाणी, वाहतूक मंदावली
आरके पुरम मेजर सोमनाथ मार्गावर झाडे कोसळली, वाहतूक ठप्प
मिंटो ब्रिज अंडरपासमध्ये पाणी साचलं, वाहने बंद पडली
कनॉट प्लेस फ्लायओव्हरवर वाहतूक कोंडी
डीडीयू मार्ग अपघात आणि वाहतूक कोंडी, पाणी साचलेले नाही

दिल्ली NCR साठी हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली NCRसाठी इशारा दिला असून, सध्या दिल्लीमध्ये तीव्र हवामान परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लाजपतनगर येथे वाहतूक मंदावली

दरम्यान, या पावसामुळे तापमानात घट झाली असली, तरी दिल्लीतील जलनिस्सारण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवरील तुटपुंजे नियोजन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि झाडांची कापणी करण्यासाठी काम करत आहे.