Rahul Gandhi

भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra)  श्रीनगरमधील सभेत बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावरुन आज दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन ही चौकशी करण्यात आली. विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुड्डा (Sagar Preet Hooda) यांना राहुल गांधी भेटले. तब्बल दोन तास त्यांच्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरं दिली. दरम्यान भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांना अनेक लोक भेटले, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले, सर्व माहिती जोडायला वेळ लागेल असे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे हुड्डा यांनी सांगितले. तसेच आवश्यकता असल्यास पुन्हा राहुल गांधीची चौकशी करणार असल्याचे देखील हुड्डा यांनी सांगितले.

दरम्यान या चौकशीनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडाणी यांच्यावर प्रश्न विचारल्यामुळे भाजपने मुद्दाम आता त्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा का लावला असल्याचे काँग्रेसन म्हटले आहे. भारत जोडो यात्रेच्या 45 दिवसानंतर ही चौकशी का सुरु करण्यात आली इतका वेळ का लागला? असे प्रश्न विचारण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांना महिलांची इतकी काळजी आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात राहुल यांच्याकडे का गेले नाहीत. भारत जोडो यात्रा संपून ४५ दिवसांनंतर चौकशी केली जात आहे.  असा प्रश्न काँग्रेस नेते जराम रमेश यांनी उपस्थित केला आहे. तसेच राहुल गांधी या सर्वांना कायदेशीर उत्तर देणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.