Delhi Police PRO MS Randhawa (Photo Credits: ANI)

Delhi Police on JNU Violence: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) मध्ये काल रात्री (रविवारी) विद्यार्थ्यांनावर हिंसाचार करण्यात आला, ज्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. देशातील विविध भागातून विद्यार्थी तसेच नागरिक आंदोलनं करत आहेत. अशा परिस्थितीत, दिल्ली पोलिसांनी सोमवारी म्हटले आहे की जेएनयूएसयू आणि एबीव्हीपीच्या सदस्यांमध्ये घडलेल्या जेएनयू हिंसाचाराबद्दल त्यांच्या गुन्हा शाखेला काही महत्त्वाचा पुरावा सापडला आहे आणि ते त्यावर काम करत आहे.

"याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तपास सुरू आहे. फुटेज गोळा केले जात आहे. एकूण 34 जण जखमी झाले असून त्या सर्वांना एम्स ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ”असे दिल्ली पोलिसांचे पीआरओ एमएस रंधावा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“सामान्यत: पोलिस बंदोबस्त फक्त प्रशासकीय ब्लॉकमध्ये असतो आणि घडलेली घटना ही त्या जागेपासून दूर होती. संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास आम्हाला जेएनयू प्रशासनाकडून विनंती करण्यात आली, त्यानंतर आम्ही विद्यापीठात प्रवेश केला आणि फ्लॅग मार्च काढला," ते म्हणाले.

जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आइशी घोष यांच्यावर रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्याची घटना उघडकीस आली असताना, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि त्यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आहे व गुन्हा शाखेला 'महत्त्वाचे' पुरावे मिळाले आहेत.

JNU मध्ये हिंसाचार: मॉबने कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केला, JNUSU चे अध्यक्ष आइशी घोष गंभीर जखमी; स्टुडंट युनियनने एबीव्हीपीला ठरवले दोषी

सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. विरोधी पक्ष आणि जेएनयू विद्यार्थ्यांनी या हिंसाचारासाठी भाजपची विद्यार्थी संघटना एबीव्हीपीला जबाबदार धरले आणि दिल्ली पोलिसांवर असक्रियतेचा आरोप केला. तर दुसरीकडे कॅम्पस हे राजकीय रणांगण होऊ नये, असे भाजपने म्हटले आहे.