
दिल्ली (Delhi) मधील पोलीस खात्यामधील एका सहाय्यक उपनिरिक्षकाने (ASI) धावत्या मेट्रोसमोर उडी टाकत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या प्रकरणी मृत पोलिसाचे शरीर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
जहांगीरपुरी मेट्रो स्टेशन येथे अजय कुमार नावाच्या पोलिस सहाय्यक निरिक्षकाने आत्महत्या केली. त्यावेळी स्टेशनवर इतरही प्रवासी मेट्रोची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी अचानक अजय कुमार यांनी मेट्रो असल्याचे पाहून त्याचा समोर उडी मारली.(हेही वाचा-'आई' शब्दाला काळिमा; आईच्या संमतीने तीन वर्षाच्या मुलीवर, दोघांचा तब्बल 10 दिवस लैंगिक अत्याचार)
परंतु अद्याप आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच अजय कुमार यांनी आत्महत्या का केली याबद्दल अधिक तपासणी करण्यात येत आहे.