Satyendar Jain Health Update: दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर प्लाझ्मा थेरपी; मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
Satyendar Jain (Photo Credits: ANI)

दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून काल (19 जून) त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कोरोना व्हायरसच्या संसर्गासह न्युमोनिया देखील झाल्याने त्यांची प्रकृती काहीशी नाजूक झाली होती. त्यामुळे त्यांना काल संध्याकाळी मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांनंतर त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी (Plasma Therapy) करण्यात आली आहे. सध्या सत्येंद्र जैन यांना ताप नसून त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील 24 तास ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असतील. अशी माहिती सत्येंद्र जैन यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. (दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती नाजुक; कोरोना सह न्युमोनिया चे फुफ्फुसातील इन्फेक्शन वाढल्याने चिंता, अरविंद केजरीवाल यांची माहिती)

55 वर्षीय आपचे नेते सत्येंद्र जैन यांना कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्यानंतर या आठवड्यात त्यांची दोनदा कोविड-19 ची चाचणी करण्यात आली. त्यांना खूप तापासह श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची दुसरी चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान आप पक्षाच्या नेत्या Atishi Marlena यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ANI Tweet:

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान होण्यापूर्वी ते एका बैठकीला उपस्थित राहिले होते. त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे राज्यपाल अमित बजाज, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही सहभाग होता. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सौम्य ताप, घसा खवखवण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी 9 जून रोजी कोरोना व्हायरसची चाचणी केली होती. परंतु, त्यांचा रिपोर्ट निगेव्हीट आला आहे.