दिल्ली: मित्राच्या बायकोशी लग्न करण्यासाठी केली मित्राचीच हत्या; आरोपी अटकेत
Representational Image (Photo Credits: Pixabay)

मित्राच्या बायकोवर प्रेम जडल्याने मित्राची हत्या करण्याचा एक धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मित्राच्या हत्येचा कट रचत आरोपीने मित्राच्या डोक्यावर विटेने वार करत त्याला बेशुद्ध केलं आणि रेल्वे ट्रॅकवर आणून टाकलं.

आरोपी कुलकेश याची वर्षभरापूर्वी दलबीर आणि त्याच्या पत्नीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मैत्रीखातर कुलकेश वारंवार दलबीरच्या घरी घेत असे आणि त्याच्या पत्नीला गिफ्ट्स देऊन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असे. ही गोष्टी कुलकेशच्या लक्षात येताच त्याने कुलकेशला पत्नीला भेटण्यास मनाई केली. (मीरा रोड येथे आईची हत्या करत मुलानेसुद्धा संपवले आयुष्य, लॅपटॉपवर मिळाली सुसाईड नोट)

सोमवारी, पूजा एका कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्याचे कुलकेशला कळले. त्यानंतर त्याने दलबीरला रेल्वे स्टेशनजवळ बोलावले आणि विटेने वार करत त्याला बेशुद्ध केले. त्याच अवस्थेत त्याला रेल्वे ट्रॅकवर आणून सोडले. त्याच्या अंगावरुन रेल्वे गेल्यानंतर कुलकेशने पोलिसांना अपघाताबद्दल कळवले. (सातारा: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या)

पूजा परतल्यानंतरही कुलकेश पूजाचे सांत्वन करु लागला. मात्र दलबीरचे फोन रेकॉर्ड्स चेक केल्यानंतर मात्र कुलकेशचं पितळ उघड पडलं. त्यानंतर त्याने गु्न्हाची कबुलीही दिली. त्याने पूजाला लग्नाची वारंवार मागणी घातली होती. मात्र पूजा आपल्या पतीला सोडण्यास तयार नसल्याने ती त्याला सातत्याने नकार देत होती. त्यामुळे कुलकेशने दलबीरच्या हत्येचा कट रचला.