मीरा रोड येथे आईची हत्या करत मुलानेसुद्धा संपवले आयुष्य, लॅपटॉपवर मिळाली सुसाईड नोट
Representational Image (Photo: Twitter)

मुंबईतील (Mumbai) मीरा रोड (Mira Road) येथे एका तरुण मुलाने आईची हत्या केल्यानंतर स्वत: सुद्धा आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.

तरुण मुलाने आईची हत्या करत एक सुसाईट नोट लिहून ठेवत त्यानेसुद्धा आत्महत्या केली. परंतु या प्रकरणामागील कारण अद्याप स्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शेजाऱ्यांना हत्या केलेल्या घरातून दुर्गंधीचा वास येत असल्याने त्याबद्दल पोलिसात तातडीने कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु मृतदेह आतमध्ये असलेल्या घराच्या दरावाज्याला आतील बाजूने कडी लावल्याने पोलिसांना दरवाजा तोडून आतमध्ये जावे लागले. तेव्हा महिलेवर धारधार शस्राने वार केल्याचे दिसले आणि मुलाच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा दिसून आल्या नाहीत. पोलिसांनी घरात याबद्दल छडा लावण्यासाठी शोधाशोध सुरु केली असता त्यांना घरातील एका लॅपटॉपवर सुसाईट नोट मिळाली.(पुणे येथील प्रसिद्ध हॉटेलमधील चिकन बिर्याणीतून रक्त, ग्राहक संतप्त)

मात्र दोघांचे मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच या प्रकरणाबद्दल अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचसोबत शेजारील मंडळींनी आई आणि मुलगा गेले चार दिवस घराबाहेर आले नसल्याचे सुद्धा पोलिसांना सांगितले. परंतु अचानक घरात मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.