पुणे येथील प्रसिद्ध हॉटेलमधील चिकन बिर्याणीतून रक्त, ग्राहक संतप्त
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) येथील एका प्रसिद्ध हॉटेलमधील चिकन बिर्याणीतून रक्त येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकाच्या निदर्शनास ही बाब लक्षात आली असता त्याने हॉटेल मालकाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. तसेच हॉटेल मालकाला याबद्दल सांगितल्यावर त्याने तुम्हाला 15 टक्के फूडवर सूट देतो असे म्हटले. त्याचसोबत हा विषय अधिक नको वाढवायला असे सुद्धा ग्राहकाला सांगण्यात आले.

कर्वे नगर येथील वसतीगृहातील काही जण जवळच असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चिकन बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिर्याणी खात असताना चिकनमधून रक्त येत असल्याचे दिसून आले. याबद्दल मालकाला सांगत सर्व मुलांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.(हेही वाचा-मुंबई: ऑफिस मधून 30 लाख चोरून महिला अकाउंटंट प्रियकरासोबत फरार, CCTV फुटेज मध्ये मिळाला पुरावा)

त्याचसोबत अशा प्रकारची बिर्याणी खाऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले. परंतु खाण्यासाठी आलेल्या मुलांनी हॉटेल मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली नाही.