प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) येथील वाई (Wai) येथून समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने या महिलेने प्रियकराच्या मदतीने 10 वर्षांच्या मुलाला कॅनॉलमध्ये ढकलून जीव घेतला. आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (वर्धा: आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचा,अल्पवयीन मुलाने केला खून)
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आश्विनी चव्हाण असे या महिलेचे नाव असून ती वाईत राहत होती. तिचे बावधन येथे राहणाऱ्या सचिन कुंभार याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. मात्र अश्विनीचा मोठा मुलगा गौरव याचा अडसर प्रेमसंबंधात येत असल्याने अश्विनी आणि सचिनने त्याचा काटा काढायचे ठरवले आणि कॅनॉलमध्ये ढकलून त्याची हत्या केली. इतकंच नाही तर त्यानंतर मुलगा हरवला असल्याची तक्रार तिने स्वतःच वाई पोलिस स्टेशनमध्ये 29 एप्रिल रोजी दाखल केली.
मात्र त्याच दिवशी गावकऱ्यांना गौरवचा मृतदेह कॅनॉलजवळ काही अंतरावर सापडला. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. चौकशीनंतर हा सर्व प्रकरा उघडकीस आला.