भारत पे (BharatPe) चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर यांना दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) मोठा झटका दिला आहे. कोर्टाने अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) यांना 48 तासांच्या आत भारत पे आणि एसपीआय चेरमन यांच्या विरोधात केलेले आपले ट्वीट (Tweet) डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत. अश्नीर ग्रोवर यांनी आपल्या पोस्ट मध्ये भारत पे आणि एसबीआय चेरमन विरोधात अपमानजनक भाषेचा वापर हा केला होता.
अश्नीर ग्रोवर हे भारत पे च्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवू शकत नाहीत. तसेच एसबीआय चेअरमन यांच्या बद्दल केलेलं ट्वीट टाळता येण्याजोगे होते. हे ट्विट फक्त भारतपेचे चेअरपर्सन जे की एसबीआयचे माजी चेअरमन आहेत त्यांच्याबद्दल एक संकेत होता असेही कोर्टाने म्हटले आहे. (हेही वाचा-'BharatPe'ला सरकारने पाठवली नोटीस, संस्थापकावर केलेल्या कारवाईची मागवली माहिती)
भारतपेचे को फाउंजप अश्नीर ग्रोवर यांनी एसबीआयवर आपला राग व्यक्त केला आहे. ग्रोवर यांनी १२ मार्च 2024 रोजी ट्विट केलं होतं की - एसबीआयचे अध्यक्ष हे लहान लोक असल्याचं दिसून येतं आणि मुळातच त्यांच्यात काहीतरी चुकीचे आहे. मी हे वाईट अनुभवातून शिकलो आणि आता हीच बाब सर्वोच्च न्यायालयाल देखील लक्षात आली आहे. यापुर्वी अश्नीर ग्रोवर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेला पत्र लिहून भारत पे च्या शेअरहोल्डिंगची चोकशी सुरू करण्याची मागणी केली होती.
2022 पासून एसबीआयचे माजी चेअरमन रजनीश कुमार आणि अश्नीर ग्रोवर यांच्यात वाद सुरू आहेत. तेव्हा ग्रोवर यांनी ट्विट करत रजनीश कुमार यांची भारतपे मध्ये हायरिंग सर्वात मोठी चूक होती असं म्हटलं होतं. रजनीश कुमार भारतपे च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमन होते. यासोबतच ग्रोवर यांनी डेटामध्ये गोंधळ झाल्याबद्दल देखील अनेक गंभीर आरोप केले होतो.