दिल्ली: सोने-चांदीचे भाव पुन्हा घसरले, सराफा बाजारातील आजचे दर जाणून घ्या
सोन्याचा भाव Photo Credits Pixabay

दिल्ली: सोने (Gold)-चांदीच्या (Silver) दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. तर ऐन लग्नसराईच्या काळात ग्राहकांना कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तर स्थानिक सरापा बाजारात शनिवारी सोन्याच्या दरात 60 रुपयांनी घसरण झाली. तर चांदीचे भाव 50 रुपयांनी घसरले आहेत.

सोन्याचांदीच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर 60 रुपयांनी कमी झाले असून प्रति 10 ग्रॅम 32590 रुपये त्याचे दर झाले आहेत. चांदीच्या दरात 60 रुपयांनी घसरण झाली असून 38025 रुपये दर झाले आहेत.

दिल्ली येथे सराफा बाजारात 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याच्या भावात 170 रुपयांनी घसरण झाली आहे. तर शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाल्याने त्याचे दर 1295.50 डॉलर प्रति औंस होता. तसेच चांदीसाठी दर 15.13 डॉलर प्रति औंस होता.