सोने दर (संग्रहित, संपादित प्रतिमा)

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत होती. परंतु आता लग्नसराईच्या वेळेस पुन्हा सोन्याचे भाव गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत चालले आहेत. तर दिल्ली (Delhi) सराफ बाजारात मात्र चांदीचे भाव घसरले आहेत.

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 200 रुपयांना वाढले असून 32870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तर चांदीचे भाव 30 रुपयांनी कमी होऊन 38570 रुपये प्रति किलो झाले आहे. चांदीसाठी इंडस्ट्रियल युनिट यांच्याकडून जास्त मागणी करण्यात आली नाही. ट्रेडर्स यांच्या मते अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सध्या सुरु असणाऱ्या तणावामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत. तसेच क्रूड ऑईलचे भावसुद्धा वाढले आहेत.(ATM Fraud: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 61 खातेदारांची ATMच्या माध्यमातून फसवणूक; असे ठेवा आपले पैसे सुरक्षित)

जागतिक स्तरावक न्यूयॉर्कमध्ये सोने 12790.10 डॉलर प्रति औंस तर चांदी 15.10 डॉलर प्रति औंस दर सुरु आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 99.9 टक्के शुद्ध सोने 200 रुपयांनी वाढले असून 32,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याचे दर 200 रुपयांनी वाढले असून ते 32,700 रुपये प्रति 10 ग्रॅम दर झाले आहे.