सोन्याच्या भावात सातत्याने घसरण, सराफ बाजारमधील दर जाणून घ्या (Photo Credits-Facebook)

लग्नसराईचा मुहूर्त सुरु असून सोन्याच्या भावातात गेली काही दिवस घसरण होत आहे. तसेच चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली असून स्थानिक बाजारातीस मागणीत घट झाल्याने दरांमध्ये घट झाली आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 170 रुपयांनी घसरण झाल्याने दर 32,850 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

तसेच शिक्का निर्मात्यांनी चांदीची मागणी कमी केल्यामुळे त्याचेसुद्धा भाव घसरले आहेत. तर चांदीच्या दरात 350 रुपयांनी घसरण होऊन 38,200 रुपये दर झाला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ होत आहे. त्यामुळेच सोन्याचा दर 1,285.50 डॉलर प्रति औंस झाला आहे. तसेच चांदीच्या दरात वाढ झाली असून 15.13 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

सराफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या भावात 170 रुपयांनी घसरण झाली.सोन्याचांदीच्या दरात घट झाल्याने नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.