Delhi Weather | Photo Credits: PTI

दिल्ली सह उत्तर भारतामध्ये सध्या थंडीचा कडाका पडला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार थंडीचा पारा आगामी काही दिवसांमध्ये अजून अंश खालावण्याची शक्यता आहे. 2019 डिसेंबरमधील थंडीच्या तापमानाने यंदा मागील 100 वर्षातील निच्चांक गाठला आहे. 1901 नंतर आता दुसर्‍यांदा भारतामध्ये डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं आहे. दिल्लीत आज पहाटे थंडीचा पारा 4.2 इतका खाली गेला होता. सामान्य तापमान 7 अंशाच्या आसपास तर कमाल तापमान 13अंश इतके आहे. दिल्लीत गेल्या 22 वर्षातील थंडीचा रेकॉर्डब्रेक, राज्यातील तापमानाचा पारा 12 अंशावर.

दिल्लीमध्ये 1997 नंतर सलग दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ थंडीचा पारा खालावण्याचा यंदा रेकॉर्ड झाला आहे. 1997 मध्ये सलग 17 दिवस थंडी पडली होती. डिसेंबरमध्ये 20 अंश पेक्षा कमी तापमान यापूर्वी 1919, 1929,1961,1997 साली नोंदवण्यात आलं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा दिल्लीचं तापमान 4 अंश पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली प्रमाणेच राजस्थान, फत्तेपूरमध्ये थंडीचा पारा खालावला आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस तापमान शून्य अंश तापमानाच्या आसपास आहे. त्यामुळे उत्तर भारतातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.