स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हेमा मालिनी, अनुराग ठाकूर सह भाजपा खासरादांनी केली संसद परिसरात सफाई
Swachh Bharat Mission (Photo Credits: Twitter)

'स्वच्छ भारत' या मोदी सरकारच्या उपक्रमामध्ये आज (13 जुलै) भाजपा खासदारांनी सहभाग घेत दिल्ली येथील संसद भवन परिसरात साफ सफाई केली आहे. यामध्ये खासदार हेमा मालिनी (Hema Malini), केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यासोबतच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांचादेखील समावेश होता. सार्‍या खासदारांनी संसदेबाहेरील परिसरात झाडूने साफसफाई केली. सध्या 'स्वच्छ भारत अभियाना'चा (Swachh Bharat Abhiyan) शेवटचा टप्पा देशात सुरू आहे.

ANI Tweet

मोदी सरकारने 2014 च्या सुरूवातीस 'स्वच्छ भारत अभियान' घोषित केलं होतं. या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला ओडीएफ घोषित करणं हे होतं. या अभियानाअंतर्गत 1.96 लाख करोड रूपयांद्वारा ग्रामीण भागात नऊ करोड शौचालय निर्माण करण्याचं लक्ष्य होतं. सध्या या उपक्रमाअंतर्गत 5.6 लाख गावांना ओडीएफ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. Video: शेतात गवत कापण्याची अॅक्टींग करताना मजा आली: हेमा मालिनी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान हाती घेण्यात आलं होतं. त्यांची स्वच्छ भारताची इच्छा साध्य करून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हे अभियान असल्याचं सांगण्यात आलं आहे.