Delhi: देशाची राजधानी जहांगीरपुरी येथील परिसरात एक धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. खरंतर येथील 3 अल्पवयीन मुलांनी कथित रुपात सिनेमाच्या स्टाइलने एका व्यक्तीने हत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. दिल्ली पोलिसांच्या मते, आरोपी हे पुष्पा आणि गुन्ह्यासंबंधित वेबसीरिज पहायचे. यामागील कारण असे की, गुन्हेगारांच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. दिल्ली पोलिसांनी असे म्हटले की, या प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांच्या नुसार, आरोपींनी या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा तयार केला होता. त्यांना हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ही पोस्ट करायचा होता.(Delhi Crime: 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी 'प्रेयसीशी लग्न' करण्यासाठी चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनकडुन अटक)
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, जहांगीरपुरी पोलिसात बुधवारी बाबू जगजीवन राम स्मारक रुग्णालयातून एक बातमी आली होती. त्यात असे म्हटले होते की, एका व्यक्तीच्या पोटात चाकू खुपसला असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तपासादरम्यान असे कळले की, मृत व्यक्तीचे नाव शिबू असून तो जहांगीरपुरी येथे राहणारा होता.(Delhi: सुप्रीम कोर्टाच्या बाहेर व्यक्तीकडून आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर)
सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले की, मृतक आणि आरोपीच्या मध्ये भांडण झाले होते. त्यानंतर अल्पवयीन आरोपींनी व्यक्तीवर चाकू हल्ला केला. पोलिसांनी असे म्हटले की, आरोपींनी चौकशीवेळी असे म्हटले ते पुष्पा आणि भौकाल सारख्या वेब सीरिज पाहून ते गँगस्टरच्या लाइफस्टाइल पासून प्रभावित होते.