Delhi: सुप्रीम कोर्टाच्या बाहेर व्यक्तीकडून आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
Supreme Court | (Photo Credit: ANI)

Delhi: सुप्रीम कोर्टाच्या बाहेर शुक्रवारी एका व्यक्तीने स्वत:वर रॉकेट टाकून आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला लागलेली आग मोठ्या शर्थीने विझवली पण तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अधिक गंभीर आहे. आत्महदन करणाऱ्या व्यक्तीची ओखळ राजभर गुप्ता म्हणून झाली आहे. असे सांगितले जात आहे की, तो नोएडा येथे राहणारा आहे. पण त्याने आत्महदन करण्याचा प्रयत्न का केला याबद्दल अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या गेट क्रमांक 1 च्या जवळ राजभर हा आला आणि त्याने अचानक स्वत:वर रॉकेल टाकत जाळून घेतले. तो त्यामध्ये पेटला गेल्याचे पाहता त्याची आग विझवली गेली आणि त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(Delhi Crime: 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी 'प्रेयसीशी लग्न' करण्यासाठी चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनकडुन अटक)

राजभर याने स्वत:ला आग लावल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली. काही लोक आगीचे लोट पाहून घाबरले. तर गेटजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. राजभर याला आगीपासून वाचवले गेले तोपर्यंत तो खुप जळाला होता. त्यामुळेच त्याला लगेच रुग्णालयात नेले गेले.(Shocking! बाथरूममध्ये आढळले आई व 7 वर्षांच्या मुलीचे मृतदेह; गिझरमधील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय)

दरम्यान, पोलिसांकडून राजभर याच्या नातेवाईकांना संपर्क करुन त्यांना याबद्दल कळवण्यात आले. त्याचसोबत यामागील कारण जाणून घेण्यासाठी नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. सुत्रांचे असे म्हणणे आहे की, एका केस संबंधित राजभर हा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. यामुळेच त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही.