दिल्लीत अर्पित पॅलेसला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 17 वर पोहचला, अन्य नागरिकांसाठी बचाव कार्य सुरु
Delhi Arpit Hotel Fire (Photo Credits-ANI)

दिल्लीतील (Delhi) करोलबाग स्थित असलेल्या अर्पित हॉटेलला (Arpit Hotel) लागलेल्या आगीत मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तसेच पहाटे 4 वाजता ही आग लागल्याने प्रथम 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात होते.

घटनस्थळी अग्निशमन दलाच्या 26 गाड्या हॉटेलमधील अन्य नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. (हेही वाचा-दिल्ली येथे अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, नऊ जणांचा मृत्यू)

अर्पित हॉटेलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप उघडकीस आले नाही. तसेच केरळ मधून आलेल्या एकाच कुटुंबातील 10 मंडळी या हॉटेलमध्ये थांबली होती. त्यातील 7 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यास यश आले आहे.