Cyclone | Image For Representation (Photo Credits: PTI)

Cyclone Yaas: भारतीय नौसेनेकडून उत्तर अंदमान समुद्रात कमी दबावाच्या पट्ट्यात यास चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे संभावित बचावकार्यासाठी आपले नौसैनिक जहाज आणि विमान यांना अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी एका विधानात असे म्हटले की, चार नौसेनिक जहाजांना नागरिकांच्या मदतीसाठी आणि एचएडीआरसोबत स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. डायव्हिंग आणि वैद्यकीय कार्यसंघ अशा क्षेत्रांमध्ये मदत करणार आहेत जे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला अधिक प्रभावित करणार आहेत.

चक्रीवादळ यास पासून बचाव करण्याासाठी आठ एनडीआरएफच्या तुकड्या आणि चार डायव्हिंग दल ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहेत. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीसह सर्वाधिक फटका बसणाऱ्या क्षेत्रात मदत करण्यासाठी चार नौसेनिक जहाज पाठवण्यात आले आहेत.(Cyclone Yaas: 'तौक्ते' पाठोपाठ आता 'यास' चक्रीवादळाचा धोका; पाहा कोणकोणत्या राज्यांना सतर्कतेचा इशारा)

Tweet:

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नौसेनेकडून चक्रीवादळ यास वर लक्ष ठेवून आहेत. ज्यामुळे बंगालच्या खाडीत पुढील 24 तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हे उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. तर 26 मे रोजी उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तटावरुन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांसह नौसेना अधिकाऱ्यांनी पूर्व तयारी केली आहे. चक्रीवादळ यासच्या आवश्यकतेनुसार मदत देण्यासाठी राज्य प्रशासनासोबत सुद्धा संपर्क साधला जात आहे.

शनिवारी सकाळी पूर्व-मध्य बंलाच्या खाडीत एक कमी दबावाचा पट्टा निर्माण झाला आहे. जो 24 मे पर्यंत तीव्र होऊन तो चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. आयएमडी यांच्या मते, वेरी सिवियर सायक्लोनिक स्टॉर्म अधिक तीव्र असणार आहे. त्यानंतर 26 मे रोजी संध्याकाळी उत्तर-उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकणार असून पश्चिम बंगाल आणि आजूबाजूच्या उत्तर ओडिशा आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टीवरुन जाणार आहे.