मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून 4 दिवस धावणार
Rajdhani Express (Photo Credits-Twitter)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने तिसरी राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) आता आठवड्यातून चार वेळा धाव असणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तिसरी राजधानी म्हणजेच सीएसएमटी (CSMT) ते हजरत निजामुद्दीन (Hazrat Nizamuddin) राजधानी एक्सप्रेस आता प्रवाशांना आठवड्यातील चार दिवस उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ही एक्सप्रेस आठवड्यातील दोनच दिवस धावत होती.

तिसरी राजधानी एक्सप्रेस मुंबईहून प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी सोडण्यात येते. मात्र आता सोमवारी आणि शुक्रवारी सुद्धा धावणार आहे. त्याचसोबत हजरत निजामुद्दीन येथून गुरुवारी आणि रविवारसह आता मंगळवार आणि शनिवारी सुद्धा ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचे माहिती आणि संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी असे म्हटले आहे की, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 13 सप्टेंबरला तिसरी राजधानी आठवड्यातून चार वेळा धावणार असल्याचा निर्णयाला हिरवा कंदिल दाखवला आहे. तर उद्यापासून पहिली राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी येथून सकाळी 10.40 मिनिटांनी सुटणार आहे. तर हजरत निजामुद्दीन स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी 4.53 वाजता पोहचणार आहे. त्याचसोबत पियुष गोयल रेल्वेच्या नव्या इमारतीचे सुद्धा उद्धाघटन उद्या करणार आहेत. यापूर्वीपासून राजधानीच्या दोन एक्सप्रेस मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई-दिल्ली दरम्यान चालवल्या जातात.(मुंबई - दिल्ली राजधानी एक्सप्रेस पाठोपाठ, सिद्धेश्वर एक्सप्रेस सह 6 एक्सप्रेस ट्रेनचा वेग वाढला, पहा नव्या वेळापत्रकानुसार CSMT, पुणे येथे एक्सप्रेस ट्रेन्स कोणत्या वेळेत येणार)

तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर राजधानी एक्सप्रेस 24 ऑगस्ट पासून पुश-पूल (Push–Pull Train) पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवासाचा कालावधी आता एका तासाने कमी होणार आहे. मुंबई - दिल्ली दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस आत्तापर्यंत 1384 हे अंतर 16 तासामध्ये कापत होती. तर पूल पुश पद्धतीने राजधानी एक्सप्रेसच्या मागे आणि पुढे 6000 हॉर्स पॉवरचे इंजिन जोडण्यात आल्याने गाडीचा वेग वाढणार आहे. तसेच ब्रेक तात्काळ कार्यान्वित करण्याची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे.