देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणत केले जात आहे. अशातच आता सरकारकडून आणखी एक महत्वाची घोषणा दिव्यांगांसाठी केली आहे. त्यानुसार दिव्यांगाना युनिक डिसअॅबिलिटी आयडेन्टिंफिकेशन (UDID) हा त्यांना फोटो आयडी रजिस्ट्रेशनसाठी म्हणून कोविनअॅपवर वापरता येणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिव्यांगाच्या रजिस्ट्रेशनसाठी फोटो आयडीला परवानगी द्यावी असे पत्रात नमूद केले आहे.
लसीकरणापूर्वी फोटो आयडीचे वेरिफिकेशन करणे अत्यावश्यक असल्याची आधीच सुचना दिली गेली आहे. केंद्रीय सरकारने या संबंधित राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात असे ही म्हटले की, केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्रालयाने दिव्यांगाना जी ओळखपत्र दिली आहेत. त्यामध्ये व्यक्तीचे नाव, लिंग, वय आणि फोटो या गोष्टींचा सुद्धा समावेश आहे.(Fact Check: कोविड-19 लस रजिस्ट्रेशनसाठी CoWinHelp App ची होणार मदत? PIB ने केला Viral WhatsApp Message मागील खुलासा)
>>CoWIN App वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-
- CoWIN portal www.cowin.gov.in. ला भेट द्या.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा आणि तुमची माहिती भरून Submit करा. तुम्हाला 'Schedule appointment' टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रांची यादी मिळेल. तुमचे जवळचे लसीकरण केंद्र निवडून त्यातील तुमच्या सोयीनुसार, वेळ निवडा
- त्यानंतर नोंदणी केलेल्या तारखेला निवडलेल्या वेळेनुसार, निवडलेल्या ठिकाणी जाऊन लस घ्या.
- नागरिक एका मोबाईलवरुन तिघांची नोंदणी करु शकता.
- जर तुम्ही ठरलेल्या दिवशी वा ठरलेल्या वेळेत लस घेण्यास जाऊ शकलात नाही, तर तुम्ही तेथे जाऊन Cancel किंवा Reschedule पर्याय निवडू शकता.
कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी कॅप्चा वापरला जात होता. मात्र त्याची आता गरज भासणार नाही आहे. पण कोविन अॅपवर आता रजिस्ट्रेशन करताना एक चार अंकी कोड दिला जात आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला हा कोड तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या लसीकरण केंद्रावर दाखवू शकणार आहात.