COVID-19 Vaccine Update: Covishield चा दुसरा डोस 2-3 महिन्यांनी दिल्यास 90% परिणामकता दिसू शकेल; Adar Poonawalla ची माहिती
Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (Serum Institute of India) चे सीईओ अदार पुनावाला (Adar Poonawalla) यांनी कोविशिल्ड (Covishield vaccine) या कोविड 19वरील लसीच्या दोन डोस मध्ये अडीच ते तीन महिन्याचा फरक ठेवल्यास लसीची परिणामकता 90% पर्यंत गाठता येऊ शकते असा दावा केला आहे. दरम्यान Lancet मध्ये 2021 च्या सुरूवातीला प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, AstraZeneca आणि Oxford University यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनवण्यात आलेली परिणामकता महिन्याभराच्या डोस साठी 70% आहे.

Adar Poonawalla यांनी India Today TV सोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ट्रायल्स मध्ये एका गटामध्ये दोन डोस मध्ये महिन्याभराचा कालावधी ठेवल्यानंतर 60-70% परिणामकारता होती. तर काही हजारांच्या गटाला 2-3 महिन्यांच्या कालावधीत डोस दिल्यानंतर परिणामकता 90% गेल्याचं पहायला मिळालं आहे. इतर लसींमध्ये देखील दोन डोस मध्ये जितके जास्त अंतर असेल तितकी परिणामकता अधिक असल्याचं दिसत आहे.'

भारतामध्ये मागील महिन्यातच केंद्र सरकारने कोविड 19 लसीच्या नियमावलीमध्ये बदल करत कोविशिल्ड च्या पहिल्या आणि दुसर्‍या डोस मध्ये 8 आठवड्यांचे अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान हा निर्णय व्हॅक्सिन अ‍ॅडमिनेस्ट्रेशनच्या National Expert Group कडून घेण्यात आला आहे. AZD1222 च्या इतर देशांमध्ये झालेल्या चाचण्यांमध्ये जर दुसरा डोस 6 आठवडा पुढे गेल्यास त्याची परिणामकारता वाढते आहे. Coronavirus Vaccine Update: भारतात 2024 पर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार कोरोनाची लस-SII.

सध्या भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिल्या जात आहेत. देशात 8 कोटी पेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लस देण्यात आल्या आहेत.