कडकनाथ (Photo Credits-FacebooK)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च (DHR) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोना संक्रमणाच्या दरम्यान त्यावर मात केल्यानंतरच्या डाएटमध्ये कडकनाथ कोंबड्याचा वापर केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. कृषि विज्ञान आणि झबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने असे ही म्हटले की, कडकनाथच्या मासामध्ये भरपुर प्रमाणात प्रोटी, विटामिन, जिंक आणि लो फॅट आढळतात. तसेच तो कोलेस्ट्रॉल फ्री सुद्धा असतो. अशातच पोस्ट कोविड आणि कोविडच्या दरम्यान याचा डाएट प्लॅनमध्ये समावेश करु शकता.

या पत्रासोबत नॅशनल मीट रिसर्च आणि मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आलेले रिपोर्ट्स सुद्धा जोडण्यात आले आहेत. दोन्ही संस्थांनी चिठ्ठी आणि अन्य कागदपत्र मुख्य मेडिकलला पाठवले आहेत. कडकनाथ याची अंड्यांवर सुद्धा अधिक जोर दिला गेला आहे.(Covid-19 Vaccination for Breastfeeding Mothers: स्तनपान करणाऱ्या मातांनी कोविड -19 लसीकरण करून घ्यावे- डॉ. समीरन पांडा)

आता आयसीएमआरवर निर्भर आहे की, झाबुआच्या कडकनाथ कोंबड्यासह त्याच्या अंड्यांचा कोविड आणि पोस्ट कोविडच्या रुग्णांच्या डाएटमध्ये समावेश करावा की नाही. कोरोना संक्रमणानंतर अत्यंत कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांवर याचा किती प्रभाव पडतो याबद्दल अंतिम परीक्षणानंतर निकाल समोर येऊ शकतो. जर परिणाम सकारात्मक असतील तर त्याचा डाएटमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

मध्य प्रदेशातील झाबुआ स्थित कृषि विज्ञान केंद्र आणि कडकनाथ रिसर्च सेंटरकडून ट्विट करत सुचना दिल्या आहेत. कडकनाथ केंद्राचे निर्देशक यांनी सुचना पत्रात कागदपत्र आणि पुराव्यांसह पाठवले आहेत. खरंतर कोरोनाच्या दरम्यान आणि त्यानंतर कोविड19 च्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. याच कारणास्तव कोविडच्या रुग्णांसाठी हाय प्रोटीन डाएट योग्य असते. मात्र यामुळे रक्ताच्या गुढळ्या निर्माण होत असल्याची तक्रार सुद्धा समोर आली आहे. अशातच झाबुआचा कडकनाथ कोंबडा उत्तम ऑप्शन असल्याचे मानले जात आहे. कारण तो कोलेस्ट्रॉल आणि फॅटमुक्त असतो.