Containment Zone (Photo Credits.: ANI)

केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) आज (29  एप्रिल) एक आदेश जारी केला आहे, त्यानुसार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीचा लेखाजोखा घेऊन त्यानुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) 25 एप्रिल  रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.  आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केलेल्या अंतरपालनाबद्दलच्या व इतर मार्गदर्शक संबधित सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 25 एप्रिल 2021 रोजी मार्गदर्शक सूचना जारी करुन  राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या आठवड्यात कोविड संसर्गाचे प्रमाण 10 टक्के वा त्याहून जास्त असेल किंवा उपलब्ध खाटांपैकी 60 टक्के खाटा भरलेल्या असतील असे जिल्हे निवडून त्यांना अतिदक्षता घेण्याजोगे विभाग म्हणून मानावे आणि तेथे संसर्ग रोखण्यासाठीचे स्थानिक मार्गदर्शक नियम लावावेत असे सांगितले आहे.

एकत्रित कंटेनमेंट क्षेत्र वा मोठे कंटेनमेंट विभाग यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत गृहमंत्रालयाच्या आदेशात सूचना दिल्या आहेत.कोविड19 व्यवस्थापनाबाबतच्या राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक सूचना संपूर्ण देशभर लागू असतील. दरम्यान गृहमंत्रालयाचा हा आदेश 31 मे 2021 पर्यंत अमलात असेल अशी देखील माहिती देण्यात आली आहे. INHS जीवंती, INHS पतंजली, INHS सांधणी रुग्णालयांमध्ये काही कोविड ऑक्सिजन बेड्स स्थानिक उपलब्ध करून देत पश्चिमी नौदल मुख्यालयाचा नागरी प्रशासनाला मदतीचा हात.

भारतामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रूग्ण दिवसागणिक 3 लाखांच्या वर वाढत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारूग्ण असल्याने राज्याची काळजी वाढली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.