COVAXIN III Phase Test: कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी यशस्वी झाल्यास 1 हजारपैकी 50 टक्के जणांना दिली जाणार
Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

COVAXIN III Phase Test:  जगभरातील सर्वांचे लक्ष कोरोनावरील  लस (Coronavirus Vaccine) कधी येणार याकडे लागले आहे. अशातच जगभरातील विविध संशोधक आणि अभ्यासक कोरोनाच्या विरोधातील लस शोधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोना व्हायरसवरील कोवॅक्सीन संदर्भातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार जर कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी यशस्वी झाल्यास ती नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.(Coronavirus Vaccine Update: भारतात 2024 पर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार कोरोनाची लस-SII)

कोवॅक्सिनचे प्रमुख संशोधक डॉ. इ. व्यंकट राव यांनी असे म्हटले आहे की, कोवॅक्सिनची लस तिसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या विरोधात लढण्यास यशस्वी ठरते की नाही ते पहावे लागणार आहे. जर यशस्वी झाल्यास ती 1 हजार जणांपैकी 50 टक्के लोकांना दिली जणार आहे. त्यानंतर अन्य जणांना ती लस पुरवली जाणार असल्याचे ही व्यंकट राव यांनी असे म्हटले आहे.(COVID-19 Vaccine भारतामध्ये पुढील 4 महिन्यांत तयार असेल: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास)

 Tweet: 

तर दुसरीकडे अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवीरचा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने  दिला आहे. हे औषध कोरोना बरे होण्यासाठी गुणकारी ठरते, यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. यामुळे संपूर्ण देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.