कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 31 मे पर्यंत स्थगित
Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 31 मे 2021 पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ही बंदी आंतरराष्ट्रीय ऑल-कार्गो ऑपरेशन आणि उड्डाणांवर लागू नसणार आहे. त्याचसोबत आवश्यकता असल्यास काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर संबंधित अथॉरिटीच्या परवानगी नंतर उड्डाणसेवा सुरु केली जाईल. डीजीसीए यांनी आदेश जाहीर करत असे म्हटले आहे की, 31 मे रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत निर्धारित आंतरराष्ट्रीय कमर्शिअल प्रवासी सेवेवर बंदी असणार आहे. आंतरराष्ट्रीय निर्धारित उड्डाणांचे सक्षम प्राधिकारी यांच्याद्वारे निवडक मार्गांवर कोरोनाच्या प्रकरणांनुसार परवानगी दिली जाऊ शकते.

गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचे संकट ओढावण्यास सुरुवात झाली तेव्हा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली गेली. जवळजवळ दोन महिन्यानंतर सुरु झाली असता विमानन नियामक यांनी एअरफेअर कॅप लावले. फेब्रुवारीमध्ये DGCA कडून कमीतकमी प्राइस बँन्डवर 10 टक्के आणि अधिकाधिक प्राइस बँन्डवर 30 टक्क्यांपर्यंतची मर्यादा वाढवली होती.(COVID 19 Pandemic: कोरोनाच्या मुद्द्यावर दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु)

Tweet:

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3,86,452 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर एकूण संक्रमितांचा आकडा 1,87,62,976 झाली आहे. त्याचसोबत कोरोमुळे 3498 जणांचा मृत्यू झाल्याने तो आकडा आता 2,8,330 वर पोहचला आहे.

तर केंद्रीय गृहमंत्रालयाने 29  एप्रिलला एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीचा लेखाजोखा घेऊन त्यानुसार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने 25 एप्रिल  रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तात्काळ पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.  आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केलेल्या अंतरपालनाबद्दलच्या व इतर मार्गदर्शक संबधित सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत.