Coronavirus Vaccine | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

रशिया (Russia ) सरकारने दावा केलेली कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमनावर नियंत्रणकारी लस स्पुतनिक-5 वैक्सीन (Sputnik V Vaccine) निर्मितीसंदर्भात भारताकडे मदत मागितली आहे. यासोबतच या वॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठीही भारताला विचारले आहे. या लसीच्या निर्मितीत भारताचेही योगदान आहे. एका वरिष्ठ् अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. रशियाने स्पुतनीक 5 चा पहिला टप्पा आपल्या नागरिकांवर वापरला आहे.

दरम्यान, ही लस गॅमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँण्ड मायक्रोबायोलॉजी आणि रशीयान डायरेक्ट इनवेस्टमेंट फंड (आरडीआईएफ) द्वारा निर्माण करण्यात आली आहे. जी 11 ऑगस्ट रोजी नोंदणीकृत करण्यात आली आहे. (हेही वाचा, China Coronavirus Vaccine: चीनने जगाला दाखवली आपल्या पहिल्या कोरोना व्हायरस लसीची झलक; जाणून घ्या या लसीच्या चाचणीचे तपशील)

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, रशीया निर्मित कोरोना लसीवर आपले लक्ष आहे. रशीया द्वारा निर्मित लसीबाबत भारत विचार करतो आहे. रशीय सरकारने संपर्क करत दोन गोष्टींबाबत मागणी केली आहे. एक देशातील नेटवर्क कंपन्यांच्या माध्यमातून लस मोठ्या प्रमाणावर निर्माण करावी. दुसरे म्हणजे भारतात लसीच्या तीसऱ्या टप्प्याची चाचणी करावी.

रशीया आपला मित्र असल्याने मित्राच्या प्रस्तावावर भारत गांभीर्याने मदत करत असल्याचेही डॉ. पॉल यांनी म्हटले आहे. पॉल यांनी पुढे म्हटले आहे की, भारत या लसीची निर्मिती अधिक मोठ्या प्रमाणावर करु शकतो. जी रशीया आणि भारतासाठी अधिक चांगली आहे. या लसीचा काही भाग जगभरातील इतर देशांनाही दिला जाऊ शकतो.