Coronavirus: गेल्या 24 तासात देशात कोरोना व्हायरस संक्रमित 630 जण बरे, COVID 19 रुग्णांचा प्रकृती सुधारणा दर 25.19%
Coronavirus in India (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रण आणि लॉकडाऊन (Lockdown) स्थिती यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Health Ministry) आणि गृहमंत्रालयाची संयुक्त पत्रताक परिषद पार पडली. या वेळी माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालय संयुक्त सचिव लव (Lav Agrawal) अग्रवाल यांनी सांगितले की, देशात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संक्रमित 630 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना संक्रमित रुग्णांच्या बरे होण्याचा सरासरी दर हा 25.18% इतका राहिला आहे. 14 दिवसांपूर्वी हाच दर 13.6% इतका होता.

कोरोना रुग्णांच्या प्रकृती सुधारणेत आणि बरे होण्यात मोठी वाढ होत आहे हे एक चांगले लक्षण असल्याचे सांगत लव अग्रवाल म्हणाले की, देशभरातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 3.2% इतका आहे. 78% मृत्यूपैकी असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कोरोना सोबतच इतरही अनेक आजार होते. (हेही वाचा, Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांमध्ये वाढले 1718 नवे रूग्ण कोरोनाबाधितांचा आकडा 33050 वर!)

एएआय ट्विट

देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दुप्पटीचा दर हा 11 दिवसांवर गेला आहे. तर मृत्यू दर हा 3.2% इतका राहिल्याचेही लव अग्रवाल म्हणाले. अग्रवाल यांनी पुढे बोलताना सांगितले की, देशातील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा लॉकडाऊनपूर्वी 3.41% इतका होता. जो आता 11 दिवस झाला आहे. काही राज्यांनी तर हा दर 11-20 दिवस इतकाही नोंदवला आहे.