File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. याच दरम्यान आता आरबीआयच्या (RBI) कर्मचाऱ्यांनी त्यांचा एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा पगार पीएम केअर्स फंडसाठी (PM Cares Fund) दिला आहे. कर्मचाऱ्यांनी तब्बल 7.30 कोटी रुपयांची मदत पीएम केअर्स फंडसाठी केली आहे. सध्या कोरोनामुळे सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाधितांसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी पीएम केअर्स फंडची सुरुवात केली असून त्यात नागरिकांना आपल्या परीने आर्थिक मदत केली जात आहे. देशात सद्यची कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे नियम कठोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी सरकार सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. तर सामान्य व्यक्तीपासून ते बड्या उद्योगपतींनी पीएम केअर्स फंड मध्ये त्यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच राजकीय नेत्यांनी सुद्धा यामध्ये आपला हातभार लावला आहे. केंद्र सरकार कोरोनबाधितांची काळजी घेण्यासोबत डॉक्टरांची सुद्धा तितकीच काळजी घेत आहेत. डॉक्टरांसाठी पीपीई किट्स आणि मास्क यांचा पुरवठा वेळोवेळी त्यांना करुन देण्यात येत आहे.(नीति आयोग मधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने इमारत 48 तासांसाठी सील)

दरम्यान, देशात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच काही क्षेत्रात खासकरुन कोरोनाच्या नॉन- हॉटस्पॉट ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याची मुभा सरकारने दिली आहे. मात्र मॉल्स सुरु होणार नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.