Goa Medical College & Hospital (Photo Credits-ANI)

गोव्यात (Goa) काल रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय (जीएमसीएच) मध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसात 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी गोवा सरकारकडून तीन सदस्यांची टीम तयार केली आहे. तर गोवा फॉरवर्ड पार्टीने राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी आरोप लावला आहे की, मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या मध्ये असलेल्या वादामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी दिवसाढवळ्या हत्या झाल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारने जीएमसीएच मध्ये नुकत्याच झालेल्या मृत्यू मागील कारण स्पष्ट केलेले नाही. परंतु हायकोर्टाला सांगितले की, रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी परिवाहनासंबंधित काही मुद्दे आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पु्ष्टी केली आहे की. जीएमसीएचच्या विविध कोविड19 वॉर्डात शुक्रवारी भर्ती झालेल्या 13 रुग्णांचा मृत्यू झाला.(India Coronavirus Pandemic: कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी भारताकडे आणखी 5 शस्त्रे; 8 लसीच्या साहाय्याने करण्यात येणार कोरोनावर प्रहार; जाणून घ्या सविस्तर)

Tweet:

गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात रात्री 2 ते सकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 75 झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवार पर्यंत जीएमसीएचमध्ये 26 रुग्ण, बुधवारी 21 रुग्ण आणि गुरुवारी 15 रुग्ण आणि शुक्रवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.(खराब झालेल्या Antigen Test Kit ने केल्या 10 हजार लोकांच्या चाचण्या; निगेटिव्ह रिपोर्ट देऊन पाठवले, UP मधील धक्कादायक प्रकार)

हायकोर्ट वैद्यकिय ऑक्सिजनच्या कथित कमतरतेमुळे जीएमसीएचमध्ये झालेल्या कोविड19 च्या रुग्णांसंबंधित दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करत आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले की, हाय कोर्टाने राज्याचे नियंत्रण आपल्या हातात घ्यावे. कारण शासन व्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे.

तर गोव्यातील काँग्रेस प्रमुख गिरीश चोडनकर यांनी असे म्हटले की, राज्यातील आरोग्य मंत्री कॅमेऱ्यासमोर स्विकार करत नाही की, त्यांना माहिती होते रोज रात्री 2 ते सकाळी 6 दरम्यान मृत्यू होत होते. गोव्यात मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा जवळजवल 200-300 प्रतिदिन आहे. यावर कोणतीच कार्यवाही का केली नाही? मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी का कारवाई केली नाही? त्याचसोबत त्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या विरोधात अपराधाचा गुन्हा दाखल करणार असून गरज पडल्यास निर्दोष लोकांच्या मृत्यूसाठी न्याय देण्यासाटी सुद्धा कोर्टात धाव घेऊ.