देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळेच सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. त्याचसोबत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे सुद्धा उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. ऐवढेच नाही तर घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर विविध राज्यातील स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तर दिल्लीत घरातून मास्क न घालता बाहेर पडलेल्या 130 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क घालणे सक्तीचे केले आहे. मात्र काही नागरिकांकडून या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याने दिल्लीत आतापर्यंत 130 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.(Coronavirus: संपूर्ण देशात 'भिलवाडा मॉडेल'चे कौतुक; जाणून घ्या इथल्या प्रशासनाने नक्की कसे मिळवले कोरोना विषाणूवर नियंत्रण)
Over 130 cases registered against people in the national capital for stepping out of their houses without wearing masks to guard themselves against coronavirus: Delhi Police.
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2020
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसमुळे 206 जणांचा मृत्यू तर रुग्णांची संख्या 6761 वर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा असून तो 1300 च्या पार गेला आहे. मुंबईतील ज्या परिसरात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी सील करण्यात आले आहेत.