Coronavirus: महंत नृत्य गोपाल दास कोरोना व्हायरस संक्रमित; राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी, योगी आदित्याथ यांच्याशीही आला होता संपर्क
Mahant Nritya Gopal Das, Ram Janmabhoomi Trust Head (Photo Credits: ANI)

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (Ram Janmabhoomi Trust) अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास (Mahant Nritya Gopal Das) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्याने महंत नृत्य गोपाल दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी त्यांची तपासणी केली असता कोरोना व्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नृत्य गोपाल दास हे सध्या मथुरा येथे आहेत. अगरा येथील सीएमओ आणि इतर अनेक स्पेशल डॉक्टर्स नृत्य गोपाल दास यांच्या उपचारासाठी दाखल झाले आहेत.

अयोध्या येथे 5 ऑगस्ट रोजी झालेल्या राम जन्मभूमी शिलान्यास कार्यक्रमात महंत नृत्य गोपाल दास हे सहभागी झाले होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक नृत्य गोपाल दास यांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, अयोध्येतील राम जन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी मंदिर परिसरातील अनेक सुरक्षा कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आले होते. (हेही वाचा, Agri Comedian Vinayak Mali Tested Coronavirus Positive: प्रसिद्ध यूट्यूबर, आगरी कॉमेडीअन विनायक माळीला कोरोना विषाणूची लागण)

श्रीकृष्ण जन्माष्टमी काळात नृत्य गोपाल दास हे मथुरेला येतात. यंदाही ते नेहमीप्रमाणे मथुरेला आले असता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच अयोध्येत राममंदिर पूजारीही कोरोना व्हायरस संक्रमित आढळले होते. त्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. अयोध्येत झालेल्या राम मंदिर भूमीपुजन कार्यक्रमावेळ कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात आले होते.