Agri Comedian Vinayak Mali Tested Coronavirus Positive: प्रसिद्ध यूट्यूबर, आगरी कॉमेडीअन विनायक माळीला कोरोना विषाणूची लागण
Vinayak Mali Tested Coronavirus Positive (Photo Credit : Facebook)

गेल्या चार महिन्यांपासून देशाला कोरोना विषाणूने (Coronavirus) विळखा घातला आहे. अनेक सेलेब्ज, नेते मंडळी इतरही अनेक फिल्डमधील नामांकित व्यक्तींना कोरोना झाल्याच्या बातम्या आपण रोज ऐकत आहोत. आता प्रसिद्ध यूट्यूबर, आगरी कॉमेडीअन विनायक माळीला (Vinayak Mali) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर येत आहे. स्वतः विनायकने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. विनायकने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्टही पोस्ट केले आहे, त्यानुसार 28 वर्षीय विनायकची आजच कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याची दिसून येत आहे.

सध्या यूट्यूबवर फार कमी मराठी विनोदी वाहिन्या आहेत, ज्याद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होते. त्यातीलच एक विनायक माळीचे चॅनेल आहे. विनायकचे व्हिडिओ हे मुख्यत्वे आगरी भाषेत आहेत व हे व्हिडिओ प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मोठ्या प्रमाणात ते शेअरही होत आहेत. आता विनायकला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी त्याने फेसबुकवर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, ‘आपल्या शरीरात काही नको असलेले विषाणू आढळल्याने आपण कामापासून थोडा ब्रेक घेत आहोत.’

दुसऱ्या एका पोस्टमध्ये विनायक म्हणतो, ‘सर्व लोक बरे होत आहेत आणि माझी अवस्था बेकार झाली आहे.’ या बातमीनंतर अनेकांनी विनायकला संदेश पाठवून, त्याच्या पोस्ट खाली कमेंट करून त्याच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना केली आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

One sider luvers ase astat❤️😛👻🤟

A post shared by vinayak (@vinayakmali74_official) on

 

View this post on Instagram

 

Toh kangva adakla kesan madhe ny t mi same michel jackson sarkha dance kerto 😊

A post shared by vinayak (@vinayakmali74_official) on

सध्या विनायकच्या यूट्यूबवर 1.18 मिलिअन सबस्क्रायबर्स आहेत. साधारण तीन वर्षांपासून विनायक हे व्हिडिओ पोस्ट करत आहे. याआधी विनायकने हिंदी भाषेत काही व्हिडिओ पोस्ट केले होते मात्र त्याला अपेक्षित यश न मिळाल्याने त्याने मराठी भाषेकडे मोर्चा वळवला. (हेही वाचा: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,132 रुग्णांची नोंद; शहरामध्ये बरे झालेल्या रुग्णांनी ओलांडला 1 लाखाचा टप्पा)

हे मराठी व्हिडिओ इतके लोकप्रिय झाले की आता विनायकला ‘आगरी कींग’ म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारे टिकटॉक, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या युगात विनायकने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. लेटेस्टली मराठीकडूनही विनायकला लवकर बरे होण्यास शुभेच्छा.