Shivraj Singh Chouhan | (Photo Credits: Facebook)

मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी स्वत:च ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलल्या सर्व लोकांनी कोरोना व्हायरस चाचणी (COVID19 Tests) करुन घ्यावी असे अवाहनही चौहान यांनी केले आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले आहे की, माझ्या राज्यातील प्रिय नागरिकांनो माझ्यात कोरोना व्हायरस संक्रमनाची लक्षणं दिसत होती. माझी कोरोना व्हायरस चाचणी केली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली. माझे माझ्या सर्व सहकारी आणि संपर्कात आलेल्या व्यक्तींना अवाहन आहे की, त्यांनी आपली कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी. तसेच माझ्या निकटवर्तीयांनी क्वारंटाईन व्हावे. (हेही वाचा, Coronavirus Update in India: भारतात 48,916 नव्या रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 13,36,861 वर)

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळात असलेल्या एका कॅबिनेट मंत्र्याची कोरोना व्हायरस चाचणी नुकतीच पॉझिटीव्ह आली होती. या मंत्र्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थिती दर्शवली होती. या बैठकीस इतरही काही मंत्री उपस्थित होते.