कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर 23 मार्च पासून देशात लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अचानक या गोष्टीची घोषणा केल्यामुळे, अनेक कामगार, विद्यार्थी, जनता यांना आहे तिथेच राहावे लागले. त्यानंतर 14 एप्रिलपासून लॉक डाऊनची दुसरी फेज सुरु झाली. अशात आता देशात कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे अनेक राज्यांत जे प्रवासी कामगार, पर्यटक, विद्यार्थी अडकले आहेत, त्यांना गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) काही नियमांतर्गत प्रवासाला परवानगी दिली आहे. यासाठी राज्य सरकार त्यांच्या बसेसची व्यवस्था करतील.
एएनआय ट्विट -
Ministry of Home Affairs (MHA) allows movement of migrant workers, tourists, students etc. stranded at various places. #CoronavirusLockdown pic.twitter.com/3JH2YPAuQU
— ANI (@ANI) April 29, 2020
गृहमंत्रालयाने बुधवारी मार्गदर्शक सूचना जारी करून राज्यांना नोडल ऑथोरिटी तयार करण्याचे व लोकांना परत घेऊन येण्याचे आणि त्यांना पाठवण्याचे नियम तयार करण्याचे निर्देश दिले. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राज्यात अडकलेल्या लोकांना पाठविण्यासाठी, राज्यांशी चर्चा करून प्रोटोकॉल तयार करायला हवा व त्यानंतर नागरिकांना ने-आण करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल अधिकार्यांची नेमानिक करतील. त्यानंतर हे अधिकारी आपापल्या भागात अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यादरम्यान लोक प्रवास करणार आहेत, तेथील अधिकारी एकमेकांशी संपर्क साधतील आणि रस्तेमार्गाने या लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहचवले जाईल. (हेही वाचा: Coronavirus: 1813 नव्या रुग्णांसह भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 31787, तब्बल 1008 जणांचा मृत्यू)
लोकांना पाठवण्यापूर्वी सर्वांचे स्क्रिनिंग केले जाईल. ज्या लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत अशा लोकांनाच जाण्याची परवानगी दिली जाईल. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अडकलेल्या लोकांना पाठवण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल. या बसेसची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात येउल व प्रवासातही सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील. तसेच नागरिक त्यांच्या इच्छित स्थळी पोहचल्यावर त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.
तसेच आदेशात पुढे म्हटले आहे, कोणतेही राज्य या बसेसला त्यांच्या हद्दीत रोखणार नाही. ज्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी असेल, त्यांना त्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतु App डाऊनलोड करावे लागेल. गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्याद्वारे या लोकांची तपासणी केली जाईल.