भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. गेल्या 24 तासात 1813 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह देशातील कोरोना रुग्णांची संख्या 31787 वर पोहोचली आहे. त्यातील 22982 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 7797 जणांना उपचारादरम्यान प्रकृती सुधारल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत 1008 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात गेल्या चोविस तासात मृत्यू झालेल्या 71 जणांचाही समावेश आहे.
संपूर्ण देशाच्या आकडेवारीत महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांचाही समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या शेवटच्या अद्ययावत वृत्तानुसार महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 729 नवे कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांसह राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 9318 इतकी झाली आहे. यातील 1388 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आले आहेत. तर , आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधित 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Corona Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात 9 हजार 318 लोकांना कोरोना विषाणूची लागण; राज्यात आज एकूण 929 नव्या रुग्णांची नोंद तर, 31 जणांचा मृत्यू)
एएनआय ट्विट
With 1813 new cases & 71 deaths reported in the last 24 hours, the total number of #COVID19 positive cases in India rises to 31787 (including 22982 active cases, 1008 deaths, 7797 cured/discharged and 1 migrated): Union Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/Vu77dQ3K2m
— ANI (@ANI) April 29, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आणि देश अशा दोन्ही पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील राज्य सरकारं आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करत आहेत. त्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अर्थात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात असले तरी ही संख्या वाढते आहे हे चिंताजनक मानले जात आहे.