IRCTC कडून 14 एप्रिल पर्यंत रेल्वे गाड्या रद्द पण प्रवाशांसाठी जाहिर केली 'ही' महत्वाची सूचना
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI/IANS)

भारतात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून त्यांच्या बहुतांश सेवा पुढील 21 दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. सर्व पॅसेंजर ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिक त्यांच्या प्रवासाच्या तिकिट रद्द करत आहेत. यासाठी आयआरसीटीसीकडून प्रवाशांना एक महत्वाची सुचना देण्यात आली आहे. आयआरसीटीसीने त्यांनी दिलेल्या एका विधानात असे म्हटले आहे की, रेल्वे गाड्या बंद केल्यानंतर प्रवासी त्यांनी बुकिंग केलेल्या ई-तिकिटांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.

आयआरसीटीसी यांनी प्रवाशांना असे सांगितले की, प्रवाशांना तिकिट रद्द करण्याची आवश्यकता नाही आहे.त त्यामुळे जर तुम्ही तिकिट रद्द केल्यास तुम्हाला त्याचे कमी पैसे मिळू शकतात. यामुळे प्रवाशांनी ई-तिकिट रद्द करुन नका ज्या रेल्वेकडूनच रद्द करण्यात आल्या आहेत. तर प्रवाशांना त्यांच्या ई-तिकिटांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. रेल्वे गाड्या रद्द केल्यानंतर त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे कापले जात नाहीत. यापूर्वी रेल्वेने कोरोनाची परिस्थिती पाहता विंडोतिकिटिंग रद्द करण्यासाठी 21 जून पर्यत वेळ दिला आहे.(Coronavirus: देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 562, चाळीस रुग्ण उपचारानंतर बरे, 9 जणांचा मृत्यू)

भारतीय रेल्वेने सध्या पूर्णपणे भर मालगाड्यांवर देत आहे. कारण नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरवला जावा हे मुख्य उद्दिष्ट आहे. विविध राज्यात लॉकडाफउनची परिस्थिती असल्याने भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांकडून स्टेशन, कंट्रोल ऑफिसमधून नागरिकांच्या सेवेसाठी काम केले जात आहे. तसेच सर्व स्टेकहोल्डर्स यांनी आवश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी माहिती देण्याचे अपील सुद्धा केले आहे.