कोरोना व्हायरसचा जगभरात प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याचा उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. याच कारणामुळे इंडियो गो (IndiGO) एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबबात सांगितले आहे. तसेच कोरोनामुळे उद्योगावर परिणाम झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत कंपनीच्या सीईओ यांनी सुद्धा 25 टक्के कमी पगार घेणार असल्याचे म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून असे सांगण्यात आले आहे की, एअरलाईन्सचे भविष्य धोक्यात आहे. त्यामुळेच पैशांच्या व्यवहारावर नियंत्रण सध्याच्या काळात असणे महत्वाचे आहे. तर उद्योगातील कमाईत होणारी घट याचा विचार करता कर्मचाऱ्यांचा पगार कमी देण्यात येणार आहे. कंपनीने असे सांगितले आहे की, बॅड ए आणि बी कर्मचारी सोडून उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1 एप्रिल पासून कपात केली जाणार आहे. एअरइंडिगो कंपनीचे सीईओ रंजॉय दत्ता यांनी असे म्हटले आहे की, मी स्वत: 25 टक्के कमी वेतन घेणार आहे. सीनियर वाइस प्रेसिटंड आणि त्यावरील उच्च पदावरील कर्मचारी 20 टक्के, वाइस प्रेसिडेंट आणि कॉकपिट क्रु 15 टक्के, AVP आणि बॅड डी कर्मचाऱ्यांसह केबिन क्रू 10 टक्के कमी वेतन घेणार आहेत.(COVID-19: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 168 भारतीय रेल्वे गाड्या 31 मार्च पर्यंत रद्द)

तसेच  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे सरकारने नागरिकांना सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुद्धा स्वच्छता केली जात आहे. परंतु गर्दीची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून भारतीय रेल्वेकडून 166 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 160 च्या पार गेली आहे.