Coronavirus In India | | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus In India) रुग्णसंख्येने 68 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत भारत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूच्या संख्येत अमेरिका प्रतम, ब्राझिल द्वितीय तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्या 68,35,656 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासात आतापर्यंत 78,524 रुग्णांची नोंद झाली. तर 971 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या तब्बल 68,35,656 इतकी झाली आहे. एकूण आकडेवारीपैकी 58,27,705 नागरिकांना रुग्णालातील उपचारानंतर बरे वाटू लागल्याने सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला. 1,05,526 नागरिकांचा मृत्यू झाला. तर सध्यास्थितीत देशात 9,02,425 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत.

आयसीएमआर (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2020 पर्यंत कोरोना व्हायरस संक्रमीत तपासण्यासाठी तब्बल 83465975 नमूने तपासण्यात आले. त्यपैकी 11 लाख 94 हजार नमुने काल तपासण्यात आले. त्यांचा संक्रमितांचा सरासरी दल (पॉझिटीविटी रेट) 7% इतका राहिला. (हेही वाचा, Dharavi Model: 'धारावी मॉडेल' ने जगाला दाखवला कोरोना विषाणूशी लढण्याचा मार्ग; WHO नंतर आता जागतिक बँकेनेही केलं कौतुक)

दरम्यान, देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना व्हायरस संक्रमितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात अधिक आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, तमिळनाडु, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील मृत्यू दर आणि प्रत्यक्ष रुग्णांचे प्रमाण यात सातत्याने घट होताना दिसत आहे. भारतातील मृत्यूदर घटला असून तो 1.54% इतका झाला आहे. याशिवाय प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णसंख्येचे प्रमाणही घटले असून ते 13% इतके झलाे आहे. यासोबतच रिकवरी रेट म्हणजे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 85% इतके झाले आहे. भारतातील रिकव्हरी रेटही सातत्याने वाढतो आहे, ही दिलासादायक बाब.