Coronavirus In India | | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

India is among the top 10 countries affected by Coronavirus: भारतात कोरना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या एका दिवसात तब्बल 7 हजार पेक्षाही अधिक आढळून आली. या नव्या आकडेवारीसह जगभरातील कोरोना व्हायरस रुग्णांची अधिक संख्या असलेल्या 10 देशांच्या यादीत भारताचा समावेश (Coronavirus India In Top 10) झाला आहे. पहिल्या 10 देशांमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर इरान होता. मात्र, भारताने सोमवारी इरानला मागे टाकत पहिल्या 10 देशांच्या यादीत समावेश केला. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतात 1 लाख 38 हजार 845 कोरना संग्रमित रुग्णसंख्या आहे. खाली दिलेली आकडेवारी (*25 मे 2020 दुपारपर्यंतची आहे.)

अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली, फ्रांस, जर्मनी आणि तुर्की या देशांच्या यादीत कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या आकडेवारीनुसार भारत नवव्या क्रमांकावर आहे. इरानमध्ये आतापर्यंत 1 लाख 35 हजार 701 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर भारतात गेल्या 24 तासात कोरना व्हायर संक्रमित 6 हजार 977 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 4 हजाराच्याही पलिकडे गेला आहे, आयएनएस वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

विविध देशातील कोरोना रुग्णांची संख्या

  1. अमेरिका- 16 लाख 43 हजार 098
  2. ब्राझिल- 3 लाख 63 हजार 211
  3. रशिया- 3 लाख 44 हजार 481
  4. इग्लंड- 2 लाख 60 हजार 916
  5. स्पेन- 2 लाख 35 हजार 772
  6. इटली- 2 लाख 29 हजार 858
  7. फ्रान्स- 1 लाख 82 हजार 709
  8. जर्मनी- 1 लाख 80 हजार 328
  9. तुर्की- 1 लाख 56 हजार 827
  10. भारत - 1 लाख 56 हजार 827
  11. इराण - 1 लाख 35 हजार 701
  12. पेरु - 1 लाख 19 हजार 959

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 इतका राहिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, सद्यास्थितीत भारतात 77 हजार 103 लोक कोरोना व्हायरस संक्रमित आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 21 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व लोक कोरोना व्हायरस संक्रमित होते. दरम्यान, उपचार घेऊन बरे झालेल्या व डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 57 हजार 721 इतकी आहे.

दरम्यान, देशभराचा विचार करता महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात कोरना व्हायरस संक्रमितांची संख्या 50 हजार 231 इतकी आहे. यातील 1 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 14 हजार 600 नागरिकांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने डिस्चार्ज देण्यात आला. (हेही वाचा, Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 54 लाखांच्या वर, 3 लाख 45 हजारांहून अधिक मृत्यू)

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांची आकडेवारी

  1. महाराष्ट्र- 1 हजार 635
  2. तमिलनाडू- 16 हजार 277
  3. गुजरात- 14 हजार 56
  4. दिल्ली- 13 हजार 418

कोरना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दाखवणारी आकडेवारी

  1. महाराष्ट्र- 1 हजार 635
  2. गुजरात- 858
  3. मध्य प्रदेश- 290
  4. पश्चिम बंगाल- 272
  5. दिल्ली- 261

Coronavirus Outbreak: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण;रुग्णांचा आकडा ५० हजारच्या वर - Watch Video 

दरम्यान, वरील राज्ये वगळता भारतातील इतर राज्यांमध्येही कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या मोठी आहे. यात राजस्थान (7,028), उत्तर प्रदेश (6268), मध्य प्रदेश (6,665), आंध्र प्रदेश (2,823), बिहार (2,587), हरियाणा (1,184), जम्मू-कश्मीर (1,621), ओडिशा (1,336), पंजाब (2,606) आणि तेलंगाना (1,854) या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्येही कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.