Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मागील 24 तासात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येत 2644 नवीन प्रकरणांची तसेच 83 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या आज 39,980 वर पोहचली आहे. तसेच आजवर या जीवघेण्या विषाणूमुळे देशात 1301 मृत्यू झाले आहेत. संबंधित माहिती ही आरोग्य मंत्रालयाने दिली हे. यानुसार सद्य घडीला देशात कोरोनाचे 39,980 रुग्ण आढळले असून यापैकी 28,046 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 10,633 जणांनी कोरोनावर मात केली असून 1301 रुग्णांचा या विषाणूने बळी घेतला आहे. कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 12296 वर गेली असून मृतांचा आकडा 521 वर पोहचला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील 2000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्राची जिल्हालनिहाय रुग्णांची आकडेवारी तपासण्यासाठी इथे क्लिक करा.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्राच्या पाठोपाठ गुजरात मध्ये 5054 कोरोना रुग्ण आढळले असून 262 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिल्ली मध्ये सुद्धा 4122 कोरोना रुग्ण आणि 64 मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश (2846रुग्ण, 151 मृत्यू) , राजस्थान (2770 रुग्ण, 66 मृत्यू) आणि तामिळनाडू ( 2757 रुग्ण , 29 मृत्यू) अशी आकडेवारी आहे. या पाच राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, जगभरात सद्य स्थितीत कोरोनाचे 34 लाखाहून अधिक रुग्ण असून 2 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1435 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतची मृतांची एकूण संख्या 67,000 च्या वर गेली आहे.