भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही तज्ज्ञांच्या मते देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाव्हायरस विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता आगोदरच्या लाटेपेक्षा कोरोना संक्रमितांची संख्या या वेळी अधिक आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी देशात कोरोना व्हायरस रुग्णांची देशात संख्या वाढण्याचे कारण सांगितले आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, अनेक लोकांना असे वाटते आहे की, आता कोरोनाची लस आली आहे. त्यामळे सर्व काही ठिक झाले आहे. लोकांच्या या विचार करण्यामुळे भारता कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, असे क्वचितच घडले आहे की, कोरोना व्हायरस लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोना व्हायरस झाला आहे. महत्त्वाचे असे की, लस घेतल्यानंतर जर कोरोना संसर्ग झाला तरी घाबरण्याचे कारण नाही. लस घेतल्याने धोका बऱ्याच प्राणात कमी होतो आहे. कोणत्याही स्थितीमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग झाला असला तरी ते हाताळण्याची पद्धत सुरुवातीपासूनच निश्चित करण्यात आली आहे. (हेही वाचा, Coronavirus: Frozen Food पासून COVID-19 विषाणूची उत्पत्ती? WHO अहवाल काय सांगतोय पाहा)
टेस्ट, ट्रॅकींग आणि ट्रीय या तिन्ही गोष्टी कोरोना नियंत्रणासाठी अनिवार्य आहे. ट्रॅकींगनंतर आयसोलेशन आणि ट्रीटमेंट आवश्यक आहे. कोरोना विरुद्ध तयारीबाबत बोलताना हर्षवर्धन यांनी सांगितले की, 20 लाख बेड देशात तयार आहेत. भारत सरकार सर्व प्रकरणे गांभीर्याने पाहात आहे. गेल्या आठवड्यात 47 जिल्ह्यांसोबत एक बैठक झाली. आज सकाळी 430 जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या 28 दिसांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडत नाही.