Prime Minister Narendra Modi | File Image | (Photo Credits: ANI)

जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्ये चिंतेची बाब बनला आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसमुळे 446 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 101 रूग्ण कोरोनाबाधित आहे. अशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग जनसामान्यांमध्ये पसरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आज (24 मार्च) च्या रात्री 8 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भारतवासियांना संबोधित करणार आहे. मागील काही दिवसांपासून देशातील अनेक प्रमुख राज्य लॉकडाऊन आहेत. अनेक ठिकाणी कलम 144 लागू करत जमावबंदी, संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तरीही काही जण सरकारचे आदेश धुडकावत थेट रस्त्यावर उतरून गर्दी करत आहे, जमावबंदीच्या आदेशांना हरताळ फासत आहे. अशांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच नरेंद्र मोदींनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान त्याबाबत नागरिकांना ट्वीट करूनही कळकळीचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज नरेंद्र मोदी पुन्हा कोरोना विरूद्ध सक्षमपणे लढण्यासाठी भारतीयांना नवं आवाहन करू शकतात. Coronavirus Pandemic: भारतामध्ये Small Pox,Polio प्रमाणेच 'कोरोनाचं संकट' थोपवण्याची क्षमता; WHO ने व्यक्त केली 'ही' मोठी अपेक्षा.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी 22 मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार नागरिकांनी देशभर त्याला उदंड प्रतिसाद दिला. सोबतच संध्याकाळी 5 वाजता कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढ्यात वीरांप्रमाणे लढणार्‍या आरोग्य यंत्रणा, पोलिस कर्मचारी यांना सलाम केला. मात्र आता भारत कोरोना विरूद्धच्या लढ्यात अत्यंत संवेदनशील टप्प्यात आहे. त्यामुळे नागरिकांची अनावश्यक गर्दी करण्याची शक्य तितकी सारी कारणं संपवण्याचा सरकारचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. Coronavirus: लॉकडाउनची परिस्थिती नागरिकांनी गांभीर्याने घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

PM नरेंद्र मोदी ट्वीट

दरम्यान नुकत्याच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीमध्येही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढ्यातील आक्रमक उपाययोजनांचं कौतुक करताना भारताने ज्याप्रमाणे यापूर्वी मानवी आरोग्यावरील स्मॉल पॉक्स आणि पोलिओचं संकट परतवलं तसेच आता कोरोना विरूद्ध निर्धाराने उभं राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारत पुन्हा जगातील इतर देशांना कोरोनाचा लढा यशस्वी पणे कसा लढला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण ठरू शकतो. भारताने त्याचं नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्याचंही WHO ने स्पष्ट केलं आहे.