Coronavirus infection | Image used for representational purpose (Photo Credits: Pixarby)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण लॉकडाउनचे आदेश येत्या 14 एप्रिल पर्यंत दिले आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास मज्जाव येईल अशी सुचना सुद्धा देण्यात आली आहे. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला दिल्लीत झालेल्या निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमानंतर कोरोनाबाधितांच्या आकड्यात अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आहे. तर भारतात गेल्या 12 तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात भर पडली असून ती 1965 वर पोहचली आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून भारतातील कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार 151 जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा 1965 वर पोहचला असून आता पर्यंत मृतांचा आकडा 50 च्या पार गेला आहे. तर कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत नसल्याचे स्पष्टीकरण डब्लूएचओ यांनी काही दिवसांपूर्वी दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियात कोरोना संदर्भात व्हायरल होणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासकरुन जेष्ठनागरिक, दमा किंवा मधूमेह असलेल्या रुग्णांनी आपली काळजी घेणे अत्यावश्यक आहे.(Coronavirus: कोरोना संदर्भात ज्येष्ठांनी घ्यावयाच्या काळजीबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक सूचना जारी)

दरम्यान, कोरोना व्हायसरसच्या पार्श्वभुमीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक डब्लूएचओ यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढे केले जात आहेत. ऐवढेच नाही तर हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी राज्यातून स्थलांतर न करता त्यांसाठी जेवणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत सर्व सोय करण्यात आली असल्याचा निर्णय ही सरकारकडून जाहिर  करण्यात आला आहे.