Coronavirus (Photo Credits: IANS) Representational Image

देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 1397 वर तर मृतांचा आकडा 44 वर पोहचला आहे. तसेच संपूर्ण देशात कोरोना व्हायसरची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिले आहेत. या लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून नागरिकांना घरी थांबवण्याचे आणि स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. तर कोरोनाच संसर्ग हा खासकरुन 50 च्या पुढील वयोगटातील व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता वृद्धांनी कोरोनाच्या काळात कशा पद्धतीने काळजी घ्यावी या संदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत नसल्याचे स्पष्टीकरण डब्लूएचओ यांनी काही दिवसांपूर्वी दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियात कोरोना संदर्भात व्हायरल होणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खासकरुन जेष्ठनागरिक, दमा किंवा मधूमेह असलेल्या रुग्णांनी आपली काळजी घेणे अत्यावश्यक आहे. याच संदर्भातील सुचनावली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली असून त्यात जेष्ठनागरिकांनी काय करावे आणि काय करु नये याबाबत अधिक सविस्तर सांगण्यात आले आहे.(Covid-19: कोरोना विषाणूमुळे मनोरूग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ; इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीची माहिती)

दरम्यान, कोरोना व्हायरमुळे पालघर येथे मंगळवारी एका 50 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर आज मध्य प्रदेशात सुद्धा एका 65 वर्षीय वृद्धाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जेष्ठनागरिकांसह लहान मुलांपर्यंत कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे. तसेच आरोग्यविभागाकडून देण्यात येणाऱ्या सुचना सुद्धा योग्यतेने पाळाल्यास कोरोनापासून दूर राहता येईल.